५० लाख अनुदान मिळवा; पशुखाद्य व वैरण मुरघासबेल, वैरणीच्या विटा आणि टीएमआर बनवण्यासाठी, असा करा अर्ज

50 lakh subsidy for production of cattle feed etc केंद्र सरकारचा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग 2014-15 पासून त्याची अंमलबजावणी करत आहे. 2021-22 पासून राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे.

50 lakh subsidy for production of cattle feed etc
50 lakh subsidy for production of cattle feed etc

एका सर्वसमावेशक विकास कार्यक्रमांतर्गत रोजगाराच्या संधी वाढवणे, उद्योजकता वाढवणे, पशु उत्पादकता सुधारणे आणि मांस, शेळीचे दूध, लोकर आणि अंडी यांचे उत्पादन वाढवणे हे अद्ययावत योजनेचे उद्दिष्ट आहे. खताची उपलब्धता वाढवणे, प्रति प्राणी उत्पादन क्षमता वाढवणे, पशुधनाची वंशावळ सुधारणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे देखील यामागे आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील उत्पादनांना विपणन आणि उच्च-गुणवत्तेच्या कच्च्या मालापर्यंत पोहोचण्यासाठी संघटित क्षेत्राशी जोडून उद्योजकतेला चालना देणे हे आहे.

योजनेचा उद्देश

रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, पशुची उत्पादकता वाढवणे आहे. कुक्कुट, शेळी मेंढी व वराह पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास यासाठी अर्ज करु शकतात.

योजनेची ठळक वैशिष्टे

 • १) अर्जदाराने पोर्टलवर केंद्रशासन पत्र दि. ९.८.२०२१ तसेच दि. २८.१२.२०२२ अन्वये प्राप्त NUM नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार अर्ज भरावा.
 • २) राज्य अंमलबजावणी यंत्रणा सदर अर्जाची पड्ताडणी करून पात्र अर्जास ऑनलाईन मंजुरी देईल व as per online path हा अर्ज बँकेकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.
 • ३) बँकेने कर्जपुरवठ्याची परवानगी दिल्यानंतर सदर प्रकल्प राज्यस्तरीय कार्यकारी समितीसमोर (SLEC) मंजुरीसाठी पाठवला जाईल.
 • ४) सदर प्रकल्पांना SLEC द्वारे मंजुरी शिफारस मिळाल्यानंतर , SIA (State Implementing Agency) सदर प्रस्तावाचे शिफारस पत्र online portal वर upload करेल व सदर प्रकल्प केंद्र शासनास मंजुरीस्तव पाठवला जाईल.
 • ५) केंद्रशासनाच्या पशुसंवर्धन विभागाची प्रकल्प मंजुरी समिती राज्य शासनाने शिफारस केलेल्या प्रकल्पांना मंजुरी देईल आणि मंजुर प्रकल्पांसाठी अनुदानाची रक्कम भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI) द्वारे लाभार्थ्यांच्या कर्ज मंजुरी देणारी बँक किंवा वित्तीय संस्थेकडे देईल.

कागदपत्रे

 • सविस्तर प्रकल्प प्रस्ताव
 • प्रशिक्षण प्रमाणपत्र
 • अनुभव प्रमाणपत्र
 • जमिनिशी सबंधित कागदपत्र (स्वतःची किंवा भाडेकरार) ७/१२
 • प्रस्तावित प्रकल्प जागेचे जीओ टॅग छायाचित्र
 • स्वतःचे भांडवल/बँक किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज बाबत पुरावा
 • पॅनकार्ड
 • वास्तव्य पुरावा
 • मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
 • कॅन्सल बँक चेक
 • आधार कार्ड
 • अर्जदाराचा फोटो
 • जात प्रमाणपत्र
 • शैक्षणिक प्रमाणपत्र
 • भागीदारी करार
 • वस्तु व सेवाकर नोंदणी प्रमणपत्र (लागु असल्यास)
 • कंपनी नोंदणी प्रमाणपत्र (FPO, FCO, Sec.8 कंपनीकरीता)
 • मागील ३ वर्षाचा ऑडीट रिपोर्ट (लागु असल्यास)
 • मागील ३ वर्षाचा आयकर विवरणपत्र (लागु असल्यास)
Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत