आधार कार्ड अपडेट करा, नाहीतर… योजनांचा लाभ आणि बँकेचे व्यवहार बंद होणार ! Aadhaar Card New Update

Aadhaar Card New Update 2024: जर तुम्ही 10 वर्षे आधी आधार कार्ड बनवलेले असेल तर ते लवकर अपडेट करून घ्या, त्यासाठी सरकारने मोठी सुविधा दिली आहे. या नवीन फीचरचे नाव काय असा प्रश्न तुम्हाला असेल. खरं तर, सरकारने आता अशा लोकांसाठी अपडेटची शेवटची तारीख वाढवली आहे, त्यांना 10 वर्षे जुने आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करता येईल.

Aadhaar Card New Update
Aadhaar Card New Update

आता तुम्ही तुमचे आधार कार्ड 14 सप्टेंबर 2023 पर्यंत मोफत अपडेट करू शकता. यापूर्वी मोफत सुविधेची अंतिम तारीख १४ जून होती, ती आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्ड अपडेट करण्यात थोडाही उशीर झाला, तर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो, कारण अशा संधी नेहमी येत नाहीत.

महत्वाच्या कामासाठी सध्या आधार हा खूप गरजेचा पुरावा आहे. अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी आधार कार्ड अपडेटविषयी सूचना देते. सध्या आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असेल तर ते आधार अपडेट मोफत करून घेता येते.

Aadhaar Card New Update: आधार कार्ड घरूनच कसे उपडेट करावे?

  • सर्वात आधी तुम्हाला माय आधार या ऑफिसिअल वेबसाइटवर जायचे आहे.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

  • तिथे तुम्हाला लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • एंटर आधार या पर्यायावर क्लीक करून तुमचा आधार नंबर टाका.
  • त्याच्याखालील क्याप्टचा टाका आणि सेंड ओटीपीवर क्लीक करा.
  • तुमचा मोबाइलला आलेला ओटीपी कोड टाका आणि लॉग इन करा.
  • एक नवीन पेज तुमचा समोर ओपन होईल त्यात शेवटून दुसरा पर्याय document update या नावाने असेल त्यावर क्लीक करा.
  • त्यांनतर 2 वेळा नेक्स्ट या बटनावर क्लीक करा तुमचा समोर “Please Verify Your डेमोग्राफिक Details” असा लिहून त्या खाली तुमची माहिती येईल ती बरोबर आहे कि नाही ते पहा आणि “I verify that the above details are correct.” यावर क्लीक करा आणि नेक्स्ट हे बटन क्लीक करा.
  • त्यांनतर तुम्हाला पत्ता पुराव्यासाठी यादीत दिलेला कोणताही एक कागदपत्र निवडून घ्यायचे आहे.
  • तुम्हाला २ जागी हे पत्त्याचे पुरावे टाकावे लागतील एका जागी पॅन कार्ड तर दुसऱ्या जागी वोटर कार्ड टाका आणि सबमिट करा तुमचा आधार अपडेट request यशश्वीपणे फ्री मध्ये सबमिट होईल.

10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट न केल्यास काय होईल?

तुमचा आधार अवैध होऊ शकतो. (UIDAI) ने म्हटले आहे की आधार धारकांना दर 10 वर्षांनी त्यांच्या पत्त्याची तपशील अपडेट करणे गरजेचे आहे. काही सेवांसाठी तुमचा आधार वापरण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. म्हणून हे अपडेट जरूर करा.

Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत