१० लाख लोकांना घर! ‘मोदी आवास योजना’ मध्ये मिळतील १२,००० कोटी! असा करा अर्ज!

Modi Awas Yojana Maharashtra : नमो शेतकरी महासन्मान योजनेनंतर, राज्य सरकारने नुकताच ओबीसी प्रवर्गातील बेघरांना लक्ष्य करून ‘मोदी आवास’ उपक्रम सुरू केला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 2025-26 पर्यंत दहा लाख ओबीसींना सामावून घेण्याचे मोठे उद्दिष्ट असलेल्या राज्यातील तीन लाख ओबीसी लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान असून योजनेसाठी १२ हजार कोटींचा निधी लागेल.

Modi Awas Yojana Maharashtra
Modi Awas Yojana Maharashtra

केंद्र सरकारने बेघरांसाठी योग्य घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास आणि अटल बांधकाम कामगार योजना लागू केली आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारने सुरू केलेल्या रमाई, शबरी आणि पारधी आवास योजना आणि यशवंतराव मुक्त वसाहत योजना, ज्यांना घरे नाहीत त्यांना भाड्याने मदत दिली जाते. शिवाय, राज्य सरकारने नुकतीच ‘मोदी आवास’ योजना खास ओबीसींसाठी आणली आहे. यादरम्यान सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ मधील प्राधान्यक्रम यादीत जे कुटुंब यादीत नव्हते त्यांच्यासाठी सप्टेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत आवास प्लस सर्वेक्षण करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : चौदावा हप्ता मिळवण्याची शेतकऱ्यांना आणखी एक संधी, अटींची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ

किमान 269 चौरस फुटांच्या घरासाठी 120,000 रुपये अनुदान दिले जाईल. गृहनिर्माण संचालक (ग्रामीण) यांच्या देखरेखीखाली राज्य व्यवस्थापन कक्षामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेच्या अंमलबजावणीवर ग्रामीण विकास विभाग देखरेख करेल.

योजनेच्या अटी :

 • लाभार्थी महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्रात रहिवासी असावा.
 • वार्षिक उत्पन्न एक लाख २० हजारांपेक्षा जास्त नको.
 • स्वत:च्या मालकीचे किंवा कुटुंबियाच्या मालकीचे घर नसावे.
 • लाभार्थीकडे स्वत:ची किंवा शासनाची कोणतीही जमीन नसावी.
 • यापूर्वी कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभार्थी घेतलेला नसावा.

Modi Awas Yojana Maharashtra : आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा, मालमत्ता नोंदपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र, लाईबिल किंवा मनरेगाचे जॉबकार्ड व बचत खात्याची बॅंक पासबूक झेरॉक्स.

राज्य सरकारचे वर्षनिहाय उद्दिष्ट

 • वर्ष उद्दिष्ट अपेक्षित निधी
 • २०२३-२४ ३ लाख ३६०० कोटी
 • २०२४-२५ ३ लाख ३६०० कोटी
 • २०२५-२६ ४ लाख ४८०० कोटी
 • एकूण १० लाख १२,००० कोटी

मोदी आवास घरकुल योजना शासन निर्णय पहा

Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत