5 लाखापर्यंत मोफत उपचार आता तुमच्या घरी! GR आर यादीमध्ये आपले नाव बघा

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंमार्फत आता पाच लाखांपर्यंत संरक्षण दिले जाणार आहे. सध्या या योजनेत प्रत्येक वर्षी प्रतिकुटुंब १.५ लाख रुपयांपर्यंत संरक्षण दिले जात होते. याबाबत शुक्रवारी (ता. २८) नवा सरकारी जीआर जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारमार्फत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २ जुलै २०१२ पासून सुरु करण्यात आली आहे. आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना आहे जी २३ सप्टेंबर २०१८ पासून महाराष्ट्र राज्यात सुरु केली गेली आहे.

Pradhan Mantri Jan Arogya Yojana New GR
Pradhan Mantri Jan Arogya Yojana New GR

या योजनेंतर्गत प्रत्येकवर्षी प्रतिकुटुंब पाच लाखांचे आरोग्य संरक्षण दिले जात असून २०१९ च्या सरकारी निर्णयानुसार दोन्ही योजना एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानुसार १ एप्रिल २०२० पासून महाराष्ट्र राज्यात या योजनेची एकसोबत अंमलबजावणी केली गेली आहे. त्यानुसार आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतही आरोग्य संरक्षण पाच लाखांपर्यंत दिले जाणार आहे. २८ जुलैला याबाबतचा सरकारी निर्णयाचा जीआर जारी करण्यात आला आहे.

रेशनकार्ड नसले तरीही, सर्वांनाच मिळणार १३५० रुग्णालयात १३५६ आजारांवर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यातील शासकीय आणि बिगर शासकीय मिळून एक हजार रुग्णालयांमध्ये सुरु केली गेली आहे. दुसरीकडे प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाखांचे आरोग्य विम्याचे कवच दिले जाते. पण, या योजनेचे कार्ड दिले गेलेले नागरिक किंवा त्यांचे नाव याआधी योजनेसाठी नोंदविण्यात आले आहे, त्यांनाच फायदा मिळतो.

या योजनेसाठी नव्याने नोंदणी करता येत नाही, त्यामुळे खूप जणांना योजना असूनही तिचा लाभ घेता येत नव्हता. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने हा नवा नवीन निर्णय घेत तुमच्याकडे शिधापत्रिका नसली तरीदेखील उपचार देण्याची सोयसुविधा केलेली आहे.

विशेष म्हणजे योजनांमध्ये या वेळेस शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश केला गेला आहे. शिधापत्रिका नसेल तर तुम्हाला रहिवासी दाखला द्यावा लागणार असून योजनेतील प्रत्येक रुग्णालयात आरोग्य मित्र असणार आहे. नागरिकांसाठी स्वतंत्र कॉल सेंटरदेखील तयार केले जातील.

Ayushman Bharat Yojana New GR: लाभार्थी कोण असणार ?

  • गट – अ : पिवळे, केशरी शिधापत्रिक असणारी कुटुंबे
  • गट – ब : पांढरी शिधापत्रिका असणारी कुटुंबे (शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्यांसह) व शिधापत्रिकाधारक नसलेली कुटुंबे.
  • गट- क : गट ‘अ आणि ब’मध्ये समाविष्ट न होणारे शासकीय, शासनमान्य आश्रम शाळेतील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांतील सदस्य, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत व महाराष्ट्राबाहेरील बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब.
  • गट – ड : महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्राबाहेरील व देशाबाहेरील रुग्ण.

हि योजना कोणत्या हॉस्पिटलमध्ये सुरु आहे ?

महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यातील शासकीय आणि बिगर शासकीय मिळून एक हजार रुग्णालयांमध्ये सुरु केली गेली आहे. तुमचा जवळचा हॉस्पिटलचा माहिती साठी तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा जिल्हा, तालुका निवडून घ्या तुम्हाला जवळचा हॉस्पिटलची माहिती मिळेल.

जवळील हॉस्पिटल पहा

अर्ज कुठे करायचा?

मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपस्थित असलेल्या आरोग्य मित्रांकडून मदत घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल. या रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले आरोग्य मित्र या योजनेंतर्गत रुग्णाची ऑनलाइन नोंदणी करतील आणि त्यांच्या उपचारादरम्यान आवश्यक मदत आणि मदत देऊ करतील. रुग्णाची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते आणि या प्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या नावाची त्यांच्या ओळखपत्रासह पडताळणी केली जाते.

ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तींकडे आरोग्य ओळखपत्र असणे आवश्यक आहे. हे कार्ड उपलब्ध नसल्यास, ते वैकल्पिकरित्या असंघटित कामगार ओळखपत्र, रेशन कार्ड, फोटो ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाचे पांढरे रेशन कार्ड किंवा 7/ 12 अर्क. याशिवाय, आश्रमशाळांचे विद्यार्थी यासाठी राज्य सरकारने विहित केलेले ओळखपत्र सादर करू शकतात.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लाभार्थ्यांना 996 गंभीर आणि महागड्या शस्त्रक्रिया, तसेच 34 निवडक विशेष सेवांद्वारे 121 शस्त्रक्रियेनंतरच्या सेवा प्राप्त करण्याची क्षमता प्रदान करते. याव्यतिरिक्त, या योजनेत कोविड-19 साठी उपचार देखील समाविष्ट आहेत. डिसेंबर 2020 पासून, 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण 93,884 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योज़नेमध्ये समाविष्ट केलेल्या 1356 उपचारांची यादी पहा:

येथे क्लीक करून यादी पहा

गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी राज्यातील रहिवाशांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. हे विशेष सेवा प्रदान करणार्‍या मान्यताप्राप्त रुग्णालयांद्वारे केले जाते. सध्या हा उपक्रम महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत, लाभार्थी म्हणून पात्र ठरलेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रति वर्ष. 1.50रु लाख पर्यंतचे विमा संरक्षण मिळते. रु. 2.50 लाख किडनी प्रत्यारोपणाची मर्यादा आहे. हि माहिती खूप महत्वाची आहे, तुमचा मित्रपरिवाराला नक्की शेयर करा.

Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत