Pik Vima : पीक विम्याचे पैसे बँक खात्यात हवे असतील तर आजच करा ‘हे’ काम, फक्त 24 तास मुदत

Pik Vima: शेतकऱ्याच्या पिकाचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि आणि रोगामुळे खूप मोठे नुकसान प्रत्येक वर्षी होत असते. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट तयार होते. शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास नैसर्गिक नुकसानामुळे हिरावून घेतला जातो. अशा वेळेला शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्यासाठी याबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सरकारने सुरू केलेली आहे. जर तुम्हाला पीक विम्याची मदत तुमच्या बँक खात्यावर जमा व्हावी असे वाटत असेल तर आजच एक गोष्ट करणे खूप महत्वाचे आहे.

Pik Vima
Pik Vima

सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु करत असते. परंतु खूपवेळा वेळेवर आपल्याला योजनांची माहिती दिली जात नाही. तसेच कधी कधी त्या योजनेला अर्ज कसा करायचा हे आपल्याला माहित नसते. पण आता तुम्हाला सरकारी आर्थिक मदत मिळवणे सोपे झालेले आहे.

फक्त २४ तास बाकी

पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा उतरवता येतो. या 1 रुपयाचा पीक विमा काढण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. मात्र अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विम्याचा अर्ज केलेला नाही, या बाबीचा विचार करून सरकारने या अर्जाची तारीख वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना ३ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. या वेळेत सर्व शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज भरावे असे आवाहन सुद्धा सरकारकडून करण्यात येत आहे. तेव्हा लगेचच हा फॉर्म भरा.

खूप जागी उशिरा पाऊस झाला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा उशिरा झाल्या आहेत. त्यामुळे पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना भाग घेता होता येणार नसल्याने यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत होते. पण आता यामध्ये तीन दिवसाची मुदतवाढ दिली गेली असून ३ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी अर्ज भरावे लागणार आहेत. याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे.

काय आहे धनंजय मुंडे यांचे ट्विट?

या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा अर्ज भरण्यास अतिउत्तम प्रतिसाद दिलेला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरलेले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे राहायला नको, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज भरण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ दिली गेली आहे. बाकी शेतकरी बांधवांनी आपला विमा (Crop Insurance) अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरावा.

1 रुपयाच्या पीक विम्याची शेवटची तारीख काय आहे?

2023 च्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) पीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2023 आहे.

Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत