या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात (Pik Vima news)

Pik Vima news : बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची आगाऊ रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आपत्तीचा फटका बसलेल्या पन्नास लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील 49 लाख 5 हजार 032 शेतकर्‍यांसाठी एकूण 2,086 कोटी 54 लाख रुपयांचा आगाऊ पीक विमा मंजूर झाला असून, त्याचे वाटप सुरू झाले आहे. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील ३६,३५८ शेतकर्‍यांचा आगाऊ पीक विमा म्हणून १८ कोटी ३९ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, ही रक्कम आता त्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.

Pik Vima news
Pik Vima news

यापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी एल्गार आंदोलनाची हाक दिली होती. बुलढाण्यात 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या ‘एल्गार महामोर्चा’ आणि अन्नत्याग आंदोलनानंतर मंत्रालयावर ताबा मिळवण्यासाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मुंबईत गेले होते. दरम्यान, 29 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविकांत तुपकर यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली.

इथे क्लीक करून तुमचा पीक विमा पहा

सह्यांद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यात हिवाळी अधिवेशनापूर्वी आगाऊ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या विनंतीचाही समावेश होता. त्यामुळे आगाऊ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत