वडील-मुलगा दोघांना मिळणार 2000 रुपये? | जाणून घ्या नियम, अधिक माहितीसाठी क्लिक करा!

PM Kisan Yojana news : देशातील कोट्यवधी शेतकरी भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेत आहेत, या योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते.

अलीकडेच, 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झारखंडमधील खुंटी येथे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला आहे. यामुळे 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2,000 रुपयांची आर्थिक मदत जमा झाली आहे.

PM Kisan Yojana news
PM Kisan Yojana news

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याचा लाभ मिळाल्याने करोडो शेतकरी खूप आनंदी आहेत. देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना मुलगा आणि वडील दोघांनाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येईल का असा प्रश्न पडलेला आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

काय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना?

पीएम किसान सन्मान निधी योजना 2018 मध्ये 20,000 कोटी रुपयांच्या बजेटसह सुरू झाली. सरकारने या योजनेवर दरवर्षी 75,000 कोटी रुपये खर्च करण्याचे उद्देष ठेवले होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना ह्या योजनेत सहभागी असल्याने सरकारला दरवर्षी बजेट वाढवावा लागतो.

1 डिसेंबर 2018 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली, हि योजना छोट्या आणि लहान शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान आहे. शेतकऱ्यांना या योजनेंमध्ये किमान उत्पन्न आधार म्हणून या प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये दिले जातात.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नावाच्या कार्यक्रमांतर्गत, जे शेतकरी यासाठी पात्र आहेत त्यांना तीन भागांमध्ये दरवर्षी ₹ 6,000 मिळतात. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. याचा अर्थ दर 4 महिन्यांनी शेतकऱ्याला ₹ 2,000 ची मदत मिळते.

वडील-मुलगा दोघांनाही मिळणार 16व्या हप्त्याचा लाभ?

तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल तर. अशा वेळेस ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, एका कुटुंबातील फक्त एक सदस्य पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतो.

एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केल्यास. अशा वेळेस त्याचा अर्ज रद्द केला जाईल. अशा परिस्थितीत पिता आणि मुलगा दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळून घेऊ शकत नाहीत.

तुमची केवायसी चेक करा

16 वा हप्ता कधी येईल?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता सरकार कधी जाहीर करू शकते, असा प्रश्न देशभरातील करोडो शेतकरी विचारत आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, सरकार 2024 मध्ये फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात 16 वा हप्ता जारी करू शकते.

विशेष म्हणजे सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्ही योजनेअंतर्गत तुमचे ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी सत्यापित केल्या नसतील. अशा परिस्थितीत ही दोन्ही महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.

KCC फॉर्म

KCC फॉर्म डाउनलोड करण्याची प्रक्रिया

  • यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या ऑफिसिअल वेबसाइटवर जावे लागेल.
  • आता तुमच्या समोर या वेबसाइटचे होम पेज येईल.
  • होम पेजवर, तुम्हाला फॉर्म कॉर्नर अंतर्गत KCC फॉर्म डाउनलोड करा या लिंकवर टॅप करावे लागेल.
  • तुम्ही या लिंकवर क्लीक करताच, KCC फॉर्म डाउनलोड करू शकतात.
Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत