PM Matru Vandana Yojana 2023 : ३.५ लाख महिलांच्या खात्यात टाकणार १९५ कोटी! अर्ज भरण्यास २ दिवस शिल्लक

PM Matru Vandana Yojana 2023 : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा दुसरा टप्पा १२ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यामध्ये पहिल्या अपत्याला पाच हजार व दुसरी मुलगी झाल्यास सहा हजारांचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे. यासाठी राज्यातील 3 लाख ४८ हजार गर्भवती व माता पात्र आहेत. यांच्या खात्यावर शनिवारी एकाच वेळी पाच व सहा हजार याप्रमाणे १९५ कोटी ८० लाख रुपये जमा होणार आहेत.

PM Matru Vandana Yojana 2023
PM Matru Vandana Yojana 2023

या योजनेंतर्गत पहिल्या जिवंत मुलासाठी पाच हजार रुपये देण्यात आले. 5000 रूपये वितरीत करण्यात आले, त्यापैकी 3 गरोदरपणात आणि 2 बाळाच्या जन्मानंतर पहिल्या लसीकरणादरम्यान देण्यात आले. आता दुसरी मुलगी असल्यास 6000 रुपये देण्याचे ठरले आहे. या योजनेचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि होणार आहे.

अर्जासाठी इथे क्लीक करा

लाभ कोणाला मिळणार?

पहिले अपत्य आहे, अशांना ५ हजार रुपये. एप्रिल २०२२ नंतर दुसरी मुलगी आहे, अशांना ६ हजार रुपये.

अर्जासाठी २ दिवस बाकी

१२ ऑगस्ट रोजी योजनेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. राज्यातील सर्व विभाग समन्वयकांची ऑनलाइन मीटिंग सुद्धा बुधवारी पार पडली. जास्तीत जास्त अर्ज भरण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

काय लागतील कागदपत्रे

  • लाभार्थी महिलेची आणि तिच्या पतीची स्वाक्षरी केलेले हमीपत्र/संमती पत्र.
  • मोबाईल नंबर – मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असावा.
  • बँक खाते तपशील.
  • लाभार्थी आणि तिचा पती यांच्या ओळखीचा पुरावा (आधार कार्ड किंवा ओळखपत्र)
  • दुसऱ्या हप्त्याचासाठी, गर्भधारणेच्या 6 महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दाखवणारी MCP कार्डची प्रत.
  • तिसऱ्या हप्त्यासाठी, लाभार्थीकडून मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी झाल्याचं MSP कार्ड.
Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत