PM YASASVI Scholarship 2023 : इयत्ता ९ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांना सरकार देईल १.२५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती, फक्त ‘हे’ करा

PM YASASVI Scholarship 2023 : इयत्ता 9 ते 11 मधील विद्यार्थ्यांसाठी यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (यशस्वी) सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल आणि जे निवडले जातील त्यांना प्रति वर्ष 1.25 लाख रुपये शिष्यवृत्ती मिळेल. या संधीसाठी देशभरातून एकूण 15 हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

PM YASASVI Scholarship 2023
PM YASASVI Scholarship 2023

नॅशनल टेस्टिंग एजन्सीला परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे आणि 29 सप्टेंबर ही परीक्षेची संभाव्य तारीख म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमी, मागासवर्गीय आणि अनुसूचित जातीतील विद्यार्थी या शिष्यवृत्ती कार्यक्रमात सहभागी होण्यास पात्र आहेत. या शिष्यवृत्ती योजनेचा प्राथमिक उद्देश आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात मदत करणे हा आहे. या कार्यक्रमात 15 हजार विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे असंख्य व्यक्तींना त्याचा लाभ मिळेल.

 असा करा अर्ज

 • PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेच्या ऑफिसिअल वेबसाइटला भेट द्या.
 • जर आपण आधीच रेजिस्ट्रेशन केलेले नसेल तर वेबसाइटवर नोंदणी करा.
 • नोंदणी झाल्यावर आपल्या क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
 • २०२३ च्या यशस्वी शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करा.
 • सर्व गरजेची माहिती भरून अर्ज पत्र भरा.
 • सर्व गरजेची कागदपत्रे अपलोड करा.
 • विहित मुदतीपूर्वी अर्ज पत्र सादर करा.

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Young Achievers Scholarship 2023 : प्रवेश प्रक्रिया :

 1. परीक्षा घेण्याची पद्धत : पेन अँड पेपर (OMR Based).
 2. या परीक्षेत १०० MCQ प्रश्न विचारले जातील.
 3. सदर परीक्षा २.३० तास (१५० मिनिटांची) असेल.
 4. ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषेत देता येईल.
 5. २९ सप्टेंबर २०२३ रोजी ही परीक्षा घेतली जाईल.
 6. या शिष्यवृत्तसाठी आणि परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्या वियार्थ्यांना कोणत्याही प्रकारची फीस भरावे लागणार नाही.
 7. या शिष्यवृत्तसाठी आणि परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइनच अर्ज भरावा लागणार आहे.
Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत