ज्येष्ठ नागरिक सर्टिफिकेट बनवा मोबाइलवरून! असा भरा अर्ज ( Indian senior citizen card online)

 Indian senior citizen card online: नमस्कार मित्रांनो, आमची योजना.कॉम वर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आर्टिकल मध्ये आपण पाहू घरी बसून तुम्ही ऑनलाईन ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र कसे काढू शकतात, आणि घरून ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र काढणे सोयीस्कर आहे त्यामुळे तुम्हाला फक्त खाली दिलेल्या सर्व स्टेप्स चे पालन करावे लागेल.

Senior Citizen Certificate Online
Senior Citizen Certificate Online

जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

 • ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
  • 1) पासपोर्ट
  • 2) पॅन कार्ड
  • 3) आधार कार्ड
  • 4) मतदाता ओळखपत्र
  • 5) आर एस बी वाय कार्ड
  • 6) म्रारोहयो जोब कार्ड
  • 7) ड्राइवर license
 • पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
  • 1) पासपोर्ट
  • 2) वीज बिल
  • 3) भाडे पावती
  • 4) शिधापत्रिका
  • 5) दूरध्वनी बिल
  • 6) पाणीपट्टी पावती
  • 7) मालमत्ता कर पावती
  • 8) मतदार यादीचा उतारा
  • 9) ७/१२ आणी ८ अ चा उतारा
  • 10) मालमत्ता नोंदणी उतारा
  • 11) मोटरवाहन चालक license
 • वयाचा पुरावा (कोणताही एक)
  • 1) जन्माचा दाखला
  • 2) बोनाफाईड प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • 4) प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा
 • रहिवासाचा पुरावा (कोणताही एक)
  • 1) रहिवासी असल्याबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला
  • 2) रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला
 • इतर
  • स्वघोष्णापत्र

वरील सर्व कागदपत्र जमा केल्यावर तुम्ही खालील स्टेप्स वापरून स्वतः ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र काढू शकता.

Step 1 Senior Citizen Certificate Online: आपले सरकार महा ऑनलाईन वर अकाउंट बनवणे

 • सर्वात आधी आपले सरकार महा ऑनलाईनचा ऑफिसिअल वेबसाइट जा.
 • सेवांसाठी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले युजर प्रोफाईल तयार करा या खालील नवीन युजर येथे नोंदणी करा या पर्यायावर क्लीक करा.
 • आपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी करून युजर आयडी आणि पासवर्ड बनवा हा पर्याय वापरून तुमचे अकाउंट बनवा.
 • किंवा दुसऱ्या पर्यायाचा वापर करून नोंदणी करा खालील विडिओ पाहून तुम्ही नोंदणी करून घ्या.

Step 2 Senior Citizen Certificate Online: आपले सरकार महा ऑनलाईन वर ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र काढणे

 • सर्वात आधी लॉग इन करून घ्या.
 • त्यांनतर बाजूला दिलेल्या ऑपशन्स मधून महसूल विभागवर क्लीक करा.
 • उप विभाग निवड असा पर्याय तिथे दिसेल त्यात महसूल सेवा पर्याय निवडा.
 • त्यात ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र हा पर्याय निवडून पुढे जावर क्लीक करा.
 • त्यांनतर एक नवीन पेज ओपन होईल त्यात सर्विस लिस्ट या पर्यायावर क्लीक करा.
 • त्यात जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र या पर्यायावर क्लीक करा एक नवे पेज ओपन होईल त्यात सर्व आवश्यक कागदपत्र दाखवलेले असतील ते वाचा आणि पूढे जा या पर्यायावर क्लीक करून खालील विडिओ पाहून फॉर्म भरा.

मी ज्येष्ठ नागरिक कार्ड ऑनलाइन बनवू शकतो का?

होय, तुम्ही महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक कार्ड ऑनलाइन तयार करू शकता. हे तुम्ही आपल सरकार पोर्टलद्वारे करू शकता.

Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत