Varas Nond Online: वारस नोंदणी आता करा मोबाइल वर ! पूर्ण माहिती पहा

Varas Nond Online: घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना घरीच बसून या नोंदीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सोयीसुविधा भूमी अभिलेख विभागाने सुरु करून दिली आहे. महसूल सप्ताहानिमित्त एक ऑगस्टपासून भूमी अभिलेख विभागाने राज्यभर ही सुविधा चालू केलेली आहे.

Varas Nond Online
Varas Nond Online

भूमी अभिलेख विभागाने अधिकाधिक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. डिजिटल सातबारा उतारा, ई-फेरफार अशा खूप सुविधांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कोरोनानंतर ऑनलाईन सुविधांचा वापरही नागरिकांकडून वाढत आहे. नागरिकांना सातबाराऱ्याचा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये, यासाठी डिजिटल सातबारा उपलब्ध करून दिलेला आहे. आता याच्यापुढील पाऊल म्हणजे कोणत्याही कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून वारसनोंदीची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ ऑगस्टपासून राज्यात ही सुविधा चालू करण्यात आली आहे.

इथे क्लिक करून महाभूमी वेबसाइटवर जा

यापूर्वी वारस नोंदीसाठी तलाठी कार्यालयात नागरिकांना जाऊन अर्ज करावा लागत होता. मृत व्यक्तीनंतर त्यांच्या सर्व वारसांची नोंद करण्यासाठी नागरिकांना महाभूमी या वेबसाइटवर जाऊन लॉगइन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. हा ऑनलाईन अर्ज संबंधित तलाठ्याकडे पाठवला जाईल. तलाठी या अर्जाची ऑनलाइनच पडताळणी करतील. कागदपत्रे कमी असतील, तर त्याची माहिती अर्जदाराला मेलद्वारे
पाठवण्यात येईल. सर्व कागदपत्रे पूर्ण असतील, तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करून देण्यात येणार आहे.

Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत